अपराध समाचार
नवऱ्याने पबजी खेळण्यापासून रोखले, बायकोने मागितला ‘घटस्फोट’
- 330 Views
- May 02, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on नवऱ्याने पबजी खेळण्यापासून रोखले, बायकोने मागितला ‘घटस्फोट’
- Edit
सध्या अनेकांना ‘पबजी’ या ऑनलाइन गेमने वेड लावले आहे. या खेळाचे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत. पबजी खेळामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका माणसाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. नवऱ्याने पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून यूएईमधील विशीतील एका महिलेने घटस्फोटासाठी खटला दाखल केला आहे.
नवरा आपल्याकडून मनोरंजनाचा अधिकार हिरावून घेत आहे असे सांगत या महिलेने घटस्फोटाच्या मागणीचे समर्थन केले आहे. पबजी गेम खेळून आपल्याला समाधान मिळते असा महिलेचे म्हणणे आहे. अजमान पोलिसांच्या सोशल सेंटरचे संचालक कॅप्टन वाफा खलील हे प्रकरण हाताळत आहेत.
ऑनलाइन गेम संदर्भात आलेली आतापर्यंतची ही सर्वात विचित्र केस आहे असे कॅप्टन अल होसानी यांनी सांगितले. पबजीवरुन नवऱ्याबरोबर कडाक्याचे भांडण झाल्यानंतर मदत मिळवण्याच्या हेतूने सदर महिला पोलीस स्थानकात आली होती. अनोळखी व्यक्तीसोबत आपण पबजी गेम खेळत नव्हतो. मित्र परिवार आणि नातेवाईकांसोबत हा खेळ खेळत असल्याचे महिलेने सांगितले.
पतीला पत्नी पबजी खेळाच्या आहारी जाण्याची भिती सतावत होती. पत्नी या खेळाच्या आहारी जाऊन आपली कर्तव्य विसरेल म्हणून नवऱ्याने तिला हा गेम खेळण्यापासून रोखले. बायकोला पबजी खेळण्यापासून रोखण्यामागे तिचे अधिकार हिरावून घेण्याचा हेतू नव्हता. फक्त कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याची आपली इच्छा होती. गोष्टी या वळणावर येऊन पोहोचतील. पत्नी घटस्फोटासाठी खटला दाखल करेल असे वाटले नव्हते असे पतीने सांगितले.