Menu

देश
मुलगा नाही सैतानच! वाईत आईवर बलात्कार करणारा नराधम अटकेत

nobanner

नराधम मुलाने आईवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना वाई तालुक्यात घडली असून नराधम मुलाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांनाही त्या मुलाने दगडाने मारहाण केली. भुईज पोलिसांनी त्या मुलाला अटक केली असून या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

वाई तालुक्यातील गावात राहणारी महिला तिच्या पतीसोबत लग्नसोहळ्यासाठी गेली होती. तिथून परतताना महिला एकटी घरी आली. तिचे पती काही वेळाने घरी येणार होते. महिला घरी परतली तेव्हा तिचा मुलगा घरासमोरील ओट्यावर बसला होता. ती खोलीत जाताच मुलानेही घरात प्रवेश केला आणि आईवरच बलात्कार केला. मुलाच्या या कृत्याने घाबरलेल्या आईने आरडाओरडा केला. घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी तातडीने घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती मुलाच्या वडिलांना दिली. मुलाच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जाब विचारला. यानंतर नराधम मुलाने वडिलांनाही दगडाने मारहाण केली. अखेर महिलेने मुलाविरोधात भुईज पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.