Menu

देश
सलमान म्हणतो, या दिवशी करेन लग्नाची घोषणा

nobanner

बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ सलमान खान लग्न कधी करणार ही चर्चा नेहमीच सुरू असते. अनेक कार्यक्रमात त्याला त्याच्या लग्नाविषयी विचारलं जातं. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नावही जोडलं जातं. आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सलमान मुलाखती देण्यात व्यग्र आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आणि हे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू अनावर होईल.

‘तू लग्न कधी करणार हा जणू आता राष्ट्रीय प्रश्न झाला आहे, यावर तू काय उत्तर देशील,’ असं त्याला विचारलं. यावर सलमान म्हणाला, ‘मला असं वाटतं की मी माझ्या लग्नाची घोषणा २३ मे रोजी केली पाहिजे.’ २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत, त्यामुळे सलमानने मुद्दामच ही तारीख गमतीशीरपणे सांगितली.

सलमान सध्या तरी लग्नबंधनात अडकणार नसला तरी तो सरोगसीचा विचार करत आहे. वडील सलीम आणि आई सलमा खान यांना नातवंडांचं तोंड पाहायचं असल्याचं सलमानने सांगितलं होतं. त्यामुळे येत्या काही महिन्यात सरोगेट पद्धतीने वडील होण्याचा सलमानचा मानस आहे.