Menu

देश
जगबुडी नदीवरील नव्या पुलाचा जोडरस्ता खचला, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच पुलाला बांधलं

nobanner

मुसळधार पावसामुळे शनिवारी(दि.29) रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. या वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र, लोकार्पणाआधीच याची दैना झाली. त्यामुळे खेडवासीय आणि वाहनचालक संतापले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक व नागरिकांनी शनिवारी संध्याकळी या मार्गावर ‘रास्तारोको’ केला. कार्यकारी अभियंता बामणे आणि गायकवाड हे पुलाची पाहणी करण्यासाठी आले असता संतप्त नागरिकांनी त्यांनाच पुलाच्या कठड्याला बांधून ठेवले. रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा बांधण्यात आला होता. काही दिवसांत तो वाहतुकीस खुला होणार होता पण त्याआधीच हा जोड रस्ता खचला आहे. या जोडरस्त्याला मोठं मोठे भगदाड पडले असून पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे देखील गेले आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच पुलाच्या संरक्षक भिंतीलाही तडे गेले आहेत. यावर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. जुना ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्याने हा नवीन पूल बांधण्यात आला होता. पण नवीन पुलाची उद्घाटनाआधीच दैना झाली आहे. 10 एप्रिल 2015 रोजी नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

जगबुडी नदीवरील जुन्या पुलाची निर्मिती ब्रिटिशांनी 1931 मध्ये केली. 6 वर्ष पुलाच्या निर्मितेचे काम सुरु होते, त्यानंतर 1937 मध्ये हा जुना पूल वाहतुकीस खुला करण्यात येवून त्यावरून वाहने धावू लागली.