Menu

देश
पावसामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक, लोकलसेवेवर परिणाम

nobanner

मुंबईत शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे महानगरीच्या वेगाला ब्रेक लागला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या लोकल उशिराने धावत आहेत. तसंच पश्चिम रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या तीन गाड्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कल्याणमार्गे जाणाऱ्या एका गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि त्याचदिवशी मुंबईहून पुन्हा पुण्याला येणाऱ्या प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस आणि पनवेल पॅसेंजर या गाड्या २९ आणि ३० जूनला रद्द करण्यात आल्या आहे. भुसावळ-पुणे-भुसावळ ही एक्स्प्रेस दौंड आणि मनमाडमार्गे सोडण्यात येणार आहे अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान मुंबईतली लोकल वाहतूही उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल २५ मिनिटे उशिराने सुरू आहेत. हार्बर मार्गावरच्या लोकलही उशिराने सुरू आहेत तसंच पश्चिम रेल्वे मार्गावरही लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.