Menu

सुषमा स्वराज यांनी सोडला सरकारी बंगला, सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव

nobanner

प्रकृती अस्वस्थेचं कारण देऊन मोदी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी तातडीने आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे. आपल्या पदावरून दूर झाले तरी पुष्कळदा नेते शासकिय निवासस्थान सोडत नाही. मात्र स्वराज यांनी तसं न करता आपलं निवासस्थान लगोलग सोडलंय. स्वराज यांच्याशिवाय माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आपला सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे.

ट्विटरद्वारे स्वराज यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. ‘8, सफदरजंग लेन मार्गावरील माझा सरकारी बंगला मी सोडला असून मी तेथील पत्त्यावर व फोन नंबरवर उपलब्ध नसेल’, असं ट्विट स्वराज यांनी केलं आहे. सुषमा स्वराज यांनी घेतलेला हा निर्णय नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून त्यांच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या नेत्याला एका महिन्याच्या आतमध्ये सरकारी बंगला सोडणे बंधनकारक असते. त्यानुसार स्वराज आणि जेटली यांनी बंगले सोडले आहेत.



Translate »