Menu

अपराध समाचार
FRP चे पैसे न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा-बच्चू कडू

nobanner

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची साखर कारखानदारकडून एफआरपी मोठ्या प्रमाणावर थकवली गेली असून काटा मारला जात आहे. अशा कारखानदारावर कारवाई करावी. या मागणीसाठी साखर आयुक्तांना आमदार बच्चू कडू आणि शेतकर्‍यांनी घेराव घालत आंदोलन केले. तर साखर आयुक्त कार्यालयावर जाऊन शेतकर्‍यांनी शोले स्टाईल घोषणाबाजी केली.

पुण्यातील साखर संकुल येथे आमदार बच्चू कडू यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली. त्या दरम्यान त्यांच्या समवेत आलेल्या शेतकर्‍यांनी साखर आयुक्तांना घेराव घातला. तर काही शेतकर्‍यांनी इमारतीच्या टेरेसवर जाऊन शोले स्टाईलने घोषणा देखील दिल्या. यावेळी साखर आयुक्तांना विविध मागण्याचे निवेदन देखील देण्यात आले.

यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अनेक कारखान्याकडून एफआरपी मोठ्या प्रमाणावर थकविण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे सहकार मंत्री विजय देशमुख यांच्या कारखान्या कडून कोट्यावधी रूपयांची एफआरपी थकवली आहे. या सहकार मंत्र्यानी शेतकऱ्यांचे लवकरात लवकर देणी द्यावी. जर त्यांनी या मागण्याची दखल न घेतल्यास राज्यात त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी दिला. तसेच उसाचे वजन करतेवेळी काटा मारण्याचे काम केले जाते. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. अशा कारखानदारवर प्रथम कारवाई करावी. त्याच बरोबर सरकारकडून एक अप तयार केले जाणार होते. यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. या सर्व प्रश्नांची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.