Menu

देश
‘कॅफे कॉफी डे’ चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता

nobanner

भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. २९ जुलै रोजी सिद्धार्थ हे बेंगळुरुला येत होते. त्याचदरम्यान ते बेपत्ता झाले. बेंगळुरूला येत असताना ते कारमधून उतरले, ज्यानंतर ते बेपत्ता झाले. ही बातमी पसरताच, एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. नेत्रावती नदीजवळ ते उतरले होते आणि अचानक बेपत्ता झाले.

सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही स्विच ऑफ आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलीसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेदेखील एस. एम. कृष्णा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

सिद्धार्थ सोमवारी बेंगळुरुला येत होते, त्याच दरम्यान संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ते कारमधून उतरले आणि फिरू लागले. मात्र फिरता फिरताच ते बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी काहीही संपर्कही होऊ शकलेला नाही. जावई बेपत्ता झाल्याने एस. एम. कृष्णा चिंतेत आहेत. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. चार दशकांहून अधिक काळ ते काँग्रेसमध्ये होते. तसेच ते महाराष्ट्राचे राज्यपालही होते. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत भाजपात प्रवेश केला.