अपराध समाचार
गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला, मुंबई नाशिक वाहतूक ठप्प
- 266 Views
- July 18, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला, मुंबई नाशिक वाहतूक ठप्प
- Edit
12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचे एक डबा कसारा ते इगतपुरी दरम्यान घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. मध्य मार्ग आणि अप मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.
या अपघातामुळे मध्य रेल्वेवरची मुंबई नाशिक वाहतूक ठप्प झाली आहे. या एक्स्प्रेसमधले सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मध्य रेल्वेचा खोळंबा होणं ही नित्याचीच बाब होऊन बसली आहे. त्यात सकाळीच हा अपघात झाला, ज्यामुळे मुंबई नाशिक रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
बुधवारीच मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी स्थानकात ओव्हरहेड वायर तुटली होती ज्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांचा खोळंबा झाला होता. आता आज पहाटे इगतपुरी कसारादरम्यान गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरल्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वे मार्गावर रोजच काही ना काही तरी समस्या उद्भवताना दिसत आहेत ज्यामुळे प्रवाशांचा संताप वाढू शकतो.