देश
तिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले. बेपत्ता २४ लोकांपैकी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर १८ जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानेच धरण फुटल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
तिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष
या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडितील १८ जण बेपत्ता आहेत. तर पाच जणांचे मृतदेह सापडलेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल झाले आहेत. पूराच्या लोंढ्यात गुरं ढोरंही पाण्यात वाहून गेलीत. धरण फुटल्यानं नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेला असून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.