अपराध समाचार
धक्कादायक ! प्रेयसीसाठी मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार
- 274 Views
- July 19, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक ! प्रेयसीसाठी मित्राला पत्नीवर करायला लावला बलात्कार
- Edit
पतीनेच मित्राला अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीकडून घटस्फोट मिळावा आणि पुन्हा एकदा आपल्या प्रेयसीकडे जाता यावं यासाठी पतीने हे धक्कादायक कृत्य केलं. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला. याप्रकरणी आरोपी पती आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.
पीडित पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार करण्यासाठी पतीने तिला आणि मित्राला हॉटेलमध्ये एकटं सोडलं होतं. यावेळी त्याने ५० रुपयांच्या दोन स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने स्वाक्षरीदेखील करायला लावली. एक घटस्फोटाचा पेपर होता तर दुसऱ्यावर तिचं लग्न मित्राशी लावण्यासाठी संमती असल्याचं लिहिलं होतं.
पीडित पत्नीने सांगितल्यानुसार, ४० दिवसांपुर्वी त्यांचं लग्न झालं आहे. पती खिलेंद्र साहू याने काही दिवसांपुर्वी आधार कार्ड काढायचं असल्याचं सांगत शेजारच्या शहरात नेलं होतं. तिथे त्याने दोन स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी करायला लावली आणि नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याचा मित्र कमलेश वाट पाहत होता.
खिलेंद्र याने पत्नीला हॉटेलमध्येच सोडलं आणि काही वेळात येतो सांगत निघून गेला. यावेळी कमलेश याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर खिलेंद्र याने पत्नीला तिच्या आई-वडिलांकडे नेऊन सोडलं. काही दिवसांनी कमलेश याने पीडित महिलेच्या घरी जाऊन स्टॅम्प पेपर दाखवत ही आपली पत्नी असल्याचा दावा केला. यानंतर ही घटना उघडकीस आली.
खिलेंद्र याने गावातील ज्येष्ठ नागरिकांसमोर पत्नीच्या चारित्र्यावर संशय उपस्थित करत घरी घेऊन जाण्यास नकार दिला. आपण कमलेश आणि पत्नीला पार्कमध्ये एकत्र पाहिलं असून तेव्हापासून संशय होता असाही दावा केला. कलमेश याने मात्र आपल्याला खिलेंद्र याने असं करायला सांगितलं असल्याची कबुली दिली. त्याला पत्नीपासून सुटका करुन घेत प्रेयसीकडे जायचं असल्यानेच त्याने हे सगळं नाटक केल्याचं उघड झालं. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर खिलेंद्र आणि कमलेश दोघांनाही अटक करण्यात आली.