Menu

देश
मध्य रेल्वेची बोंब सुरूच! म. रे. च्या सगळ्या स्थानकांवर गर्दीचा महापूर

nobanner

मंगळवारी म्हणजेच २ जुलैला १६ तास बंद असलेल्या मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बुधवारी सकाळीही कोलमडलेलीच आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार म्हणजेच अनेक गाड्या रद्द करून सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. अर्धा-अर्धा तास वाट पाहूनही लोकलमध्ये चढता येत नाही अशीच अवस्था पाहण्यास मिळाली.

मध्य रेल्वेची सेवा कोलमडल्याने मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते आहे. मुलुंड टोल-नाका ते कन्नमवार नगर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळच्या वेळी म्हणजेच अगदी पहाटे येणाऱ्या लोकल्समध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळाली. जेव्हीएलआर, सीएसटी, दादर या ठिकाणीही रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते आहे.

पावसाने विश्रांती घेतली असली तरीही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालसारखा पाऊस पुन्हा कोसळला, तर मात्र घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल होणार हे निश्चित आहे. आजचे वेळापत्रक रविवारप्रमाणे असल्याने रोजच्या तुलनेत आज लोकलच्या कमी फेऱ्या होणार आहेत. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर गर्दीच गर्दी पाहण्यास मिळते आहे. पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरची लोकल वाहतूकही पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू आहे.