Menu

देश
मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर… – रोहित शर्मा

nobanner

भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२- मालिकेपासून भारताची या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघातील कर्णधार आणि उपकर्णधारांमध्ये वाद असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये होत्या. विंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने आमच्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीच्या स्पष्टीकरणानंतर रोहित शर्माने केलेल्या ट्विटमुळे भारतीय संघामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे म्हटले जात आहे.

विराट कोहलीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर रोहित शर्माने ट्विट करत म्हटलेय की, ‘‘मी फक्त संघासाठी खेळत नाही, तर मी आपल्या देशासाठी खेळतोय.’’ यासोबतच रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत फलंदाजी करायला जातानाचा फोटो पोस्ट केला आहे.

विडिंज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने रोहित शर्माबरोबरचे मतभेदाचे वृत्त फेटाळून लावले. मी सुद्धा बातम्यांमधून रोहित शर्मा बरोबर माझे मतभेद झाल्याचे ऐकले आहे. यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधले वातावरण खूप महत्वाचे असते. रोहित बरोबर मतभेदाचे वृत्त खरे असते तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो असे विराटने उत्तर दिले. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीसुद्धा रोहित आणि विराटमध्ये मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले.

रोहित शर्माने अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. रोहित शर्माने सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्माला अनफॉलो केल्याचे वृत्त आहे.