Menu

देश
मुंबईः मरिन लाईन्सच्या समुद्रात दोन जण बुडाले

nobanner

मुंबईतील मरिन लाईन्सच्या समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी याठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे.

मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. मरिन लाईन्सच्या समुद्र किनारी गेलेले दोन जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य सुरू केले आहे. हे दोन जण मुंबईतील कोणत्या भागातील रहिवासी आहेत, याबाबतची अद्याप माहिती समोर आली नाही. बचावपथकाने शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, समुद्राला आलेल्या भरतीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण येत आहेत. ८ वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवयाला गेलेला अन्य एक तरूणही समुद्रात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.