Menu

अपराध समाचार
मुंबईत २७ वर्षीय तरुणाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या

nobanner

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला ठार केलं. नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे सगळेजण फरार झाले आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने नितेशला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

नितेशला त्याच्या मित्रांनीच कट रचून ठार केलं आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नितेशचा त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. त्याच वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेेने एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नितेशच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्याच दरम्यान ७-८ जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि तिथून पळ काढला.