Menu

देश
मुंबई: तुळशी तलाव काठोकाठ भरला

nobanner

मुंबईकरांसाठी खूषखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

तुळशी तलावाची पाणीसाठ्याची क्षमता १३९.१७ मीटर इतकी आहे. आज सकाळी या तलावाने १३७.१० मीटर एवढी पाणी पातळी गाठली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी तलाव हा एक तलाव आहे. मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. सध्या तलावात ६ लाख ३५ हजार ६५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबई आणि धरणक्षेत्र परिसरात असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होऊ शकते, असं एका पालिका अधिकाऱ्याने सांगितलं.

>> मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.

>> मुंबईला दररोज ४५०० दशलक्ष लिटरची गरज असते, मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३९०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते.

>> यामधील ३७५० दशलक्ष लिटर मुंबईसाठी तर १५० दशलक्ष लिटर ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला पुरवले जाते.

आजचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा– ५८५०९
मोडक सागर – १०५८७८
तानसा – ९८४४३
मध्य वैतरणा – १२३९२३
भातसा – २८४१७२
विहार – १५२९६
तुलसी – ७९४४
एकूण – ६,३५,६५९

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.