Menu

देश
विद्या बालनलाही टीक-टॉकची भुरळ

nobanner

अभिनय कौशल्याच्या बळावर अभिनेत्री विद्या बालन हिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. येत्या काळातही ती ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी चित्रपटांच्या कामात विद्या व्यग्र असली, तरीही ती सोशल मीडिया द्वारे नेटकऱ्यांच्या संपर्कात येण्यास विसरत नाही. याचा प्रत्यय तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओतून येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून टीक-टॉकचा ट्रेंड नेटकऱ्यांमध्ये चांगलात तग धरत आहे. याच ट्रेंडची भुरळ विद्यालाही पडली आहे. कारण, खुद्द विद्यानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. विद्याच्या या टीक-टॉक व्हिडिओमध्ये ती देसी लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा अंदाज अनेकांच्याच पसंतीसही उतरत आहे.

‘Some Tak-Tuk Time Passsssssss’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिड़िओमध्ये विद्याचा अंदाज पाहता, तिचा देसी लूक खऱ्या अर्थाने गाजतोय असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही अभिनेत्री येत्या काळात ‘मिशन मंगल’, या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार, तापसी पन्नू , शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा अशी कलाकारांची फौज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.