अपराध समाचार
आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
- 236 Views
- August 22, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या
- Edit
बारावीमध्ये आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(दि.21) पुण्यात घडली आहे. दत्तवाडीमधील जनता वसाहत परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने आपल्या एका मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज व्हॉट्स अॅपवर केला होता.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी भागात आकाश ज्ञानेश्वर सदाफुले हा कुटुंबासोबत राहत होता. त्याने अकरावी पर्यंतचे शिक्षण एस पी महाविद्यालयातून पूर्ण केले होते. 12वीला त्याला शाहु महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र त्याला प्रवेश न मिळाल्याने मागील काही दिवसापासून तो नैराश्यात होता. यामुळे त्याने रात्री साडेसातच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या एका मित्राला आत्महत्या करण्याबाबत मेसेज व्हॉट्सअॅपवर केला होता. याबाबत घरातील व्यक्तींना माहिती मिळेपर्यंत आकाशने गळफास घेतल्याची घटना समोर आली. आकाशाला जवळील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास दत्तवाडी पोलिस करत आहेत