Menu

देश
चांद्रयान-2 चा महत्त्वाचा टप्पा पार; चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश

nobanner

समस्त देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान 2 ने आज (मंगळवार) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. इस्रोकडून याबाबत माहिती देण्यात आली. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगण्यात आले होते. सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

यापूर्वी यानाच्या सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरु असल्याचे 14 ऑगस्टला इस्त्रोकडून सांगण्यात आले. भारताची ही दुसरी चंद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील माहित नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचे या मोहिमेचा उद्देश आहे.