Menu

देश
नृसिंहवाडी मंदिरात साठलं पाणी, दत्तमूर्ती पुजाऱ्यांच्या घरी

nobanner

कोल्हापूरजवळ असलेल्या नृसिंह वाडी भागात असलेल्या दत्त मंदिरात पाणी साठल्याने आज पहाटेच्या सुमारास गाभाऱ्यातील दत्त मूर्ती पुजारी महेश हावले यांच्या घरी हलवण्यात आली. टेम्बेस्वामी मंदिरापासून जवळपास कंबरेइतक्या पाण्यातून या दत्तमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हावले यांच्या घरी काकड आरती करण्यात आली. यापुढचे नित्य पूजाविधी याच ठिकाणी करण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतो आहे. त्याचमुळे अनेक ठिकाणी सखल भागातही पाणी साठलं आहे. दत्त मंदिरात पाणी साठल्याने आता मंदिरातील मूर्ती पुजाऱ्यांच्या घरी नेण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुराच्या पाण्याच्या वेढ्यात सापडला. तसंच अग्निशमन दलाच्या कार्यालयात पाणी शिरले आहे.