Menu

दुनिया
पाकिस्तानला भारताचे प्रत्युत्तर दिल्ली-लाहोर बससेवा बंद

nobanner

कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. समझौता एक्स्प्रेस, थर एक्स्प्रेस रद्द केल्यानंतर पाकिस्तानने लाहोर दिल्ली ही बससेवाही बंद केली होती. आता याच सगळ्याला उत्तर देत भारतानेही दिल्ली लाहोर बस सेवा बंद केली आहे. आज सकाळी ६ वाजता दिल्लीहून लाहोरसाठी बस रवाना होणार होती. मात्र ही बस लाहोरला रवाना झाली नाही. आज सकाळीच भारतानेही हीच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळपासूनच दिल्लीहून लाहोरच्या दिशेने जाणारी ही बससेवा भारतातर्फेही बंद करण्यात आली.

द दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात DTC ने हा निर्णय घेतला आहे. शनिवारीच पाकिस्तानातल्या एका मंत्र्यांने भारताकडे जाणारी बससेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याच निर्णयाला आता भारतानेही उत्तर दिले. पाकिस्तानने लाहोर दिल्ली बससेवा बंद केली आहे. त्यामुळे दिल्लीहून लाहोरला बस पाठवण्याचा संबंधच येत नाही असे डीटीसीने म्हटले आहे. पाकिस्तान टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने शनिवारी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन डीटीसीला बस सेवा बंद करत असल्याची माहिती दिली होती. द हिंदूने या संदर्भातले वृत्त दिले आहे.