देश
प्रभास-अनुष्का लॉस एंजल्समध्ये घेतायत घर?
एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’, ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटानंतर त्यातील प्रत्येक कलाकार चर्चेत आला. मुख्य कलाकार प्रभास हा तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या नात्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली. बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी ही जोडी खऱ्या अर्थाने ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. पण दोघांनीही कधीच त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केलं नाही. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा होत्या. पण आता त्यांच्याविषयी एक वेगळीच माहिती समोर येत आहे. प्रभास-अनुष्का त्यांचं नातं आता पुढच्या पायरीवर नेण्यास तयार झाले आहेत असं कळतंय
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास आणि अनुष्का लॉस एंजल्समध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचंही वृत्त जाहीर करतील अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
प्रभासचा ‘साहो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रभासने अनुष्कासाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. याआधी प्रभासने ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर अप्रत्यक्षपणे नात्याची कबुली दिली होती. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि अभिनेता राणा डग्गुबतीसोबत प्रभास या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. गप्पांच्या ओघात करणने राणा आणि प्रभासला ‘तुम्ही सिंगल आहात का?’ हा अपेक्षित प्रश्न विचारला. यावर दोघांनीही पटकन ‘हो’ म्हणून सांगितलं. यानंतर ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर तू खोटा बोललास का, असा प्रश्न करणने विचारला असता प्रभासने ‘हो’ असं उत्तर दिलं होतं.