Menu

देश
सलमानमुळे रिऍलिटी शो विजेत्याला लागणार लॉट्री

nobanner

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या घोषणा करत असतो. आता चक्क त्याने ‘नच बलिये’च्या कलाकारांसाठी एका लॉट्रीची घोषणा केली आहे. ‘नच बलिये’च्या यंदाच्या पर्वात जी जोडी विजयी ठरेल, त्या जोडीला सलमान स्टारर ‘दबंग ३’ चित्रपटातील एका गाण्यामध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. ‘नच बलियेच्या’ या पर्वाला सलमान खान निर्मीत करत आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार जे कपल शोची विजेती जोडी ठरेल तिला सलमानच्या चित्रपटात काम करता येणार आहे. ‘दबंग ३’ चित्रपट यंदाच्या वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे गाण्याचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे. आता कोणता सेलेब कपल सलमानसोबत थिरकण्यास पात्र असेल हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

त्याचप्रमाणे, मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची मुलगी सई ‘दबंग ३’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. चूलबूल पांडेच्या भूमिकेत झळकणाऱ्या सलमानच्या तरूणपणाच्या प्रेयसीच्या भूमिकेत सई दिसणार आहे.

‘भारत’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर सलमानची पाऊले ‘दबंग ३’च्या चित्रपटाच्या चित्रीकरणाकडे वळली आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ‘दबंग-३’ चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.