Menu

देश
आयुषमानच्या चित्रपट कारकिर्दिला लागणार ब्रेक

nobanner

‘ड्रीम गर्ल’च्या यशानंतर अभिनेता आयुषमानच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि अयुषमानचा अभिनय चाहत्यांना चांगलाच भावला आहे. ‘ड्रीम गर्ल’च्या दमदार कामगिरी नंतर त्याला अनेक चित्रपटांसाठी ऑफर्स येत आहेत. सध्या तो आगामी ‘बाला’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यानंतर तो कलाविश्वतून लांब होण्याच्या मार्गावर आहे.

आयुषमानचा ‘बाला’ नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात धडकणार आहे. याच दरम्यान तो ब्रेक घेण्याच्या मार्गावर आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी तो आपल्या कामापासून ब्रेक घेणार आहे. पत्नी आणि आपल्या मुलांसोबत तो मोठ्या सुट्टीवर जाणार आहे.

आयुषमान घेत असलेला ब्रेक किती मोठा असेल हे त्याला देखील ठाऊक नाही. याबद्दल बोलताना तो म्हणला की, ‘ माझा हा ब्रेक किती मोठा असेल हे माहीत नाही. हा काळ तीन महिन्यांपेक्षा देखील मोठा असू शकतो. मागील कित्येक वर्ष मी शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मला कुटुंबाला वेळ देता आलेला नाही.’

सध्या वेगळ्या थाटणीचे चित्रपट साकारताना दिसत असलेला अभिनेता आयुषमान ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटात ‘गे’ची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. चित्रपटात तो जितेंद्र कुमार सोबत रोमांन्स करताना दिसणार आहे.

चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त नीना गुप्ता, गजराज राव, मनु ऋषी चड्ढा, सुनीता राजवार, मानवी गगरू, तृप्ती पंखुड़ी अवस्थी आणि नीरज सिंह झळकणार आहेत. १३ मार्च २०२० रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.