Menu

देश
इस्रोचे वैज्ञानिक भावूक, तरीही त्यांची जिद्द बुलंद-मोदी

nobanner

चांद्रयान मोहिमेत थोडीशी बाधा आली ज्यामुळे इस्रोचे वैज्ञानिक भावुक झाले मात्र त्यांची जिद्द बुलंद आहे. ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि ही मोहीम यशस्वी करतील असा मला विश्वास आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक मोठं स्वप्न पाहिलं, त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र यामध्ये बाधा आली. चांद्रयान मोहिमेसाठी वैज्ञानिक दीर्घकाळ मेहनत घेत होते” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच मोहिमेत बाधा आल्याने वैज्ञानिक भावूक झाले असले तरीही ते जिद्द हरलेले नाहीत त्यांची जिद्द बुलंद आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकप्रकारे टीकाकारांना उत्तरच दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबादमध्ये बोलत होते.

दरम्यान चांद्रयान २ च्या अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदी झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करतं आहे. विज्ञानात अपयश येत नाही कारण विज्ञानात असतो तो फक्त प्रयोगच असंही मोदींनी म्हटलं होतं. त्यांनी इस्रोचे प्रमुख के. सिवन भावूक झाल्यावर त्यांची गळाभेट घेतली आणि त्यांना धीर दिला. फक्त मीच नाही सगळा देश तुमच्या पाठिशी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिवन यांना सांगितलं. मात्र या सगळ्या वैज्ञानिकांची जिद्द संपलेली नाही. चांद्रयान २ ची मोहिम हे सगळेजण फत्ते करतीलच अशी आपल्याला खात्री असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.