देश
झोमॅटोकडून १०० रुपये रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाचं बँक खातं रिकामं
झोमॅटोवरुन मागवलेली १०० रुपयांची ऑर्डर रद्द करुन पुन्हा पैसे रिफंड मिळवण्याच्या नादात तरुणाने बँक खात्यातील सर्व रक्कम गमावल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा येथे हा प्रकार घडला आहे. तरुणाच्या बँक खात्यात एकूण ७७ हजार रुपये होते. हे सर्व पैसे त्याने गमावले आहेत. विष्णू हा इंजिनियर असून त्याने झोमॅटो अॅपवरुन ऑर्डर केली होती. जेव्हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आला तेव्हा ऑर्डर केलेल्या पदार्थाचा दर्जा न आवडल्याने त्याने डिलिव्हरी बॉयला ते परत घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी डिलिव्हरी बॉयने विष्णूला झोमॅटो कस्टमर केअरच्या क्रमांकावर फोन करण्याचा सल्ला दिला. त्याने विष्णुला गुगलवर सर्च करत कस्टमर केअर नंबर मिळवण्यास सांगितलं.
सर्च केल्यानंतर जो पहिला नंबर आला त्याच्यावर फोन करुन सूचना देतील त्याप्रमाणे करा असं डिलिव्हरी बॉयने विष्णुला सांगितलं. पहिल्या क्रमांकावर फोन केला असता काही वेळाने विष्णुला त्याच्या नंबरवर फोन आला. आपण झोमॅटो कस्टमर केअरकडून बोलत असल्याचं त्याने सांगितलं. १०० रुपये रिफंड मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी तुम्हाला १० रुपये जमा करावे लागतील असं फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.
संबंधित व्यक्तीने विष्णुला १० रुपये जमा करण्यासाठी एक लिंक पाठवली. विष्णु यानेही कोणताही विचार न करता त्या लिंकवर क्लिक केलं आणि १० रुपये त्यात जमा केले. यानंतर काही मिनिटातच त्याच्या खात्यातून उरलेले ७७ हजार रुपये गायब झाले. काही वेळाने विष्णुच्या खात्यात एकही रुपया नव्हता. पेटीएमने व्यवहार करत हे पैसे काढून घेण्यात आले होते.
१० सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला असून तेव्हापासून विष्णू पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांसहित बँक आणि इतर ठिकाणी दाद मागत फिरत आहे. पण अद्यापही त्याला मदत मिळालेली नाही.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.