Menu

देश
नाशिक-पुणे केवळ एका तासात, विमानसेवा लक्ष्मीपूजनपासून होणार सुरू

nobanner

हैदराबाद आणि अहमदाबाद नंतर आता पुणेही नाशिकशी कनेक्ट होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नाशिक-पुणे विमानसेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरव्दारे येत्या २७ ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून ही सेवा सुरू पुरवली जाणार आहे. यामुळे दोन्ही प्रमुख शहरे हवाई मार्गाने परस्परांना जोडली जातील. सध्या अलायन्स एअरव्दारे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबाद या दोन शहरांसाठी सेवा दिली जात आहे.

सध्या रस्तेमार्गे पुण्याला जाण्यासाठी किमान पाच तासांचा वेळ लागतो. मात्र, विमानसेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच हे अंतर कापता येईल. या सेवेचे बुकिंग येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार ही सेवा सुरू राहणार आहे. ७० आसनी क्षमता असलेल्या या विमानात पन्नास टक्के जागा या ‘उडान’ योजनेंतर्गत राखीव असतील. उडान अंतर्गत १६२० रूपये तिकिट दर निश्चित करण्यात आला आहे.

विमानाची वेळ –
दुपारी तीन वाजता विमान नाशिकहून(ओझर) निघेल आणि पुण्याला चार वाजता पोहचेल
पुण्याहून दुपारी साडेचार वाजता हे विमान नाशिकसाठी निघेल आणि सायंकाळी साडेपाचला पोहचेल

दोन वर्षांपूर्वी नाशिक-पुणे ही विमानसेवा एअर डेक्कन कंपनीतर्फे सुरू करण्यात आली होती. मात्र, मोठा प्रतिसाद असूनही अव्यावसायिकरित्या ही सेवा देण्यात आल्याने ती बंद पडली होती.