Menu

देश
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

nobanner

एका 34 वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी पुण्याच्या उत्तमनगर पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अरुण सुरेश वाबळे (वय 34, रा. कोंढवे-धावडे, एनडीए रोड) असे मृत पतीचे नाव असून याबाबत त्यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर मृताच्या पत्नीसह सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. मृताच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, पत्नी आणि सासरच्यांकडून अरुण यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. तसंच अरुण यांना शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली होती, शिवाय गंभीर परिणाम भोगायला लागतील अशी धमकी देखील करण्यात आली होती. अरुण वाबळे यांचा दोन वर्षांपूर्वी अर्चनासोबत प्रेमविवाह झाला होता. अर्चना खासगी शिकवणी घ्यायच्या तर अरूण हे पेटिंगचं काम करायचे. त्यांना दोन मुले आहेत. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. परिणामी, सततच्या त्रासाला कंटाळून अरुण यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. नंतर नाशिकमध्ये राहणाऱ्या अरुण यांच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अर्चना, तिचा भाऊ व बहिण यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.