देश
मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद
nobanner
मुंबई आणि कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच कोकण रेल्वेच्या मार्गावर नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान ट्रॅकवर दरड कोसळल्याने तुर्तास हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणाकडे जाणारी रेल्वे वाहतूक सध्या बंद असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान रेल्वे लाईनच्या डाऊन लाईनवर दरड कोसळल्याने आणि मोठ्या प्रामाणावर चिखल साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, अप लाईनवरील वाहतूक सध्या सुरु आहे. डाऊन लाईनवरील राडारोडा हटवून मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर ही लाईन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येईल.
Share this: