Menu

अपराध समाचार
मुलीला त्रास देणाऱ्या आरएसएस कार्यकर्त्याची पित्याकडून हत्या

nobanner

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपी कवरपाल याने आपण आपला मुलगा मोनू आणि भाऊ प्रमोद यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकज आपल्या मुलीला त्रास देत होता. यामुळेच आपण हत्या केल्याचा त्याचा दावा आहे.

शनिवारी पंकजचा मृतदेह पोलिसांनी सापडला होता. पोलिसांनी कारवाई करत कवरपाल आणि त्याच्या मुलाला हत्येच्या आऱोपाखाली अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी दिली आहे. तिसरा आऱोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.