Menu

अपराध समाचार
संगोपनाचा खर्च परवडणार नाही; आई-वडिलांनी २० दिवसांच्या जुळ्या मुलींना फेकलं तलावात

nobanner

उत्तर प्रदेशमधील भिकी गावामधील एका दांपत्याने आपल्या २० दिवसांच्या जुळ्या मुलींना तलावात बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या वसीम आणि नझमा या दोघांनी २१ सप्टेंबर रोजी आपल्या जुळ्या बाळांना जवळच्या तलावामध्ये फेकून दिले. या दोघींच्या संगोपनाचा खर्च परवडणार नाही म्हणून त्यांना तलावात फेकल्याची कबुली दांपत्याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्याने शनिवारी रात्री आपल्या नवजात जुळ्या मुलींना तलावात फेकून दिले. या दोघांनाही एक सात वर्षांचा मुलगा आहे. मुलींच्या संगोपनाचा खर्च करणे शक्य नसल्याने आम्ही हे टोकाचे पाऊल उचचल्याचे आरोपींने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटले आहे. मात्र या दोघांना मुली नको असल्यानेच त्यांनी या दोन्ही बाळांचा जीव घेतल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.

आपल्या दोन्ही नवजात मुली हरवल्या आहेत अशी तक्रार वसीमनेच पोलिसांकडे नोंदवली. ‘रविवारी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा आमच्या मुली घरात नव्हत्या,’ असं वसीमने या तक्रारीमध्ये म्हटले होते. पोलिसांनी वसीम आणि त्याची पत्नीची चौकशी करत तपासाला सुरुवात केली. दोघांच्या उत्तरांमध्ये तफावत अढळल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्याने दोघांनी गुन्हा कबुल केला. दोन्ही मुलींची जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने आपणच त्यांचा जीव घेतल्याची कबुली या दोघांनी दिली. ‘आमची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला दोन्ही मुलींचा खर्च करणे शक्य नव्हते म्हणून आम्ही त्यांना तळ्यात सोडून दिले,’ अशी धक्कादायक जबाब या दोघांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी खून आणि पुरवा नष्ट करण्याच्या आरोपाखाली दांपत्याला अटक केली आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह पोलिसांनी तलावातून बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.