देश
सावधान! दिवाळीनिमित्त घातक चिनी फटाके बेकायदेशीररित्या बाजारात येण्यास सुरूवात
भारत व चीनच्या परराष्ट्र व्यापार धोरणानुसार अशाप्रकारच्या घातक फटाक्यांच्या आयातीवर बंदी आहे. या फटाक्यांची आयात केवळ डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडून देण्यात आलेल्या परवान्याद्वारेच केली जाऊ शकते. मात्र, असे दिसून आले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करत परवाना, परवानग्यांची आवश्यकता टाळण्यासाठी अनेक व्यापारी बेकादेशीर मार्गांद्वारे या घातक फटाक्यांची आयात करत आहेत, असे डीआरआयने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर डीआरआयकडून हे देखील सांगण्यात आले आहे की, आमच्या कार्यालयाकडून या अगोदरच यासंदर्भात अनेक प्रकारच्या दक्षता बाळगण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय जे फटाके कस्टम विभागाने जप्त केले आहेत, त्यावरून हे सिद्ध होते की बेकायदेशीररित्या घातक फटाक्यांची आयात केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, याबाबत सर्व यंत्रणांना काटेकोर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले असून, अशाप्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ कळवण्यासही सांगण्यात आले आहे.