Menu

टेक्नोलॉजी
Maruti Suzuki S-Presso झाली लाँच, किंमत चार लाखांपेक्षाही कमी

nobanner

Maruti suzuki S-Presso ही कार भारतात लाँच झाली आहे. केवळ पेट्रोल इंजिन व्हेरिअंटमध्येच ही कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने सर्वप्रथम 2018 ऑटो एक्स्पोमध्ये ही कार मारुती-फ्यूचर-एस या नावाने सादर केली होती.

S-Presso ही कार स्टँडर्ड, एलएक्सआय, व्हिएक्सआय, व्हिएक्सआय+, व्हिएक्सआय एजीएस आणि व्हिएक्सआय+एजीएस अशा सहा व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारमध्ये 10 सेफ्टी फीचर्स देण्यात आलेत. मारुतीच्या या छोट्या एसयूव्हीची टक्कर रेनॉच्या क्विडशी होईल. पुढील बाजूने या कारला बोल्ड लूक देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे. कारमध्ये क्रोम ग्रिल, मोठे हॅलोजन हेडलॅम्प आणि डीआरएल आहे. पुढील आणि मागील बंपर दणकट आहे. तसंच, कारला उत्तम ग्राउंड क्लिअरंस देखील आहे. निरनिराळ्या सहा रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे. कारच्या कॅबिनला काळा रंग आहे, तर टॉप व्हेरिअंटमध्ये भगव्या रंगाच्या हायलाइट्स मिळेल. डॅशबोर्डचं डिझाइन फ्यूचर-एस कॉन्सेप्टप्रमाणेच आहे. डॅशबोर्डमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आणि टेकोमीटर आहे. याच्याच खाली मारुतीचा स्मार्ट-प्ले स्टुडिओ टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आहे. स्पीडोमीटर कंसोल आणि टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम एक सर्क्युलर आउटलाइनच्या आत आहे. तर, सेंट्रल एसी व्हेंट्स सर्क्युलर आउटलाइनच्या दोन्ही बाजूंना आहे.

सेफ्टी –
10 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स यामध्ये आहेत. ईबीडी, एबीएस, स्पीड वॉर्निंग सिस्टिम, ड्राइव्ह आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर आणि रिअर पार्किंग सेंसर्स यांसारखे फीचर्स आहेत. टॉप व्हेरिअंट्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, आणि बेसिक व्हेरिअंटमध्ये केवळ ड्रायव्हरच्या बाजूचे एअरबॅग आहे.

इंजिन –
मारुती एस-प्रेसोमध्ये 1.0-लीटरचं बीएस-6 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 67hp क्षमतेची ऊर्जा आणि 90Nm टॉर्क निर्माण करतं. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय देखील आहे. याशिवाय टॉप व्हेरिअंटमध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रांसमिशनचा (AMT)पर्यायही मिळेल.

किंमत –
3.69 लाख रुपये (एक्स-शोरुम) इतकी बेसिक व्हेरिअंटची, तर 4.91 लाख रुपये (एक्स-शोरुम) टॉप व्हेरिअंटची किंमत आहे.