Menu

देश
अलिबाग येथे २२ खोल्यांच्या करोडो रुपयांच्या बंगल्यावर ईडीचा छापा

nobanner

पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक (पीएमसी) प्रकणात आज ईडीने अलिबाग येथे छापा टाकला. करोडो रुपयांच्या या अलिशान बंगल्यात अनेक वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाड्या आढळून आल्या आहेत. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत. तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमध्ये एक याट आणि एअरक्राफ्टही आढळून आले आहे.

बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवन यांच्या नावावर आहेत. तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपव्हरच्या नावावर दिसत आहे. पीएमसी प्रकरणात ईडीने तपास सुरु केला आहे. ईडीने आतापर्यंत दोन ठिकाणे शोधली आहेत. वाधनवच्या जवळचे सहकारी कोण होते, याचा शोध घेण्यात येत आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआईएल)चे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांना गुरुवारी पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह (पीएमसी) बॅंकेच्या कथित घोट्याळ्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

आलिशान बंगला.

अलिबागमध्ये ईडीला २२ खोल्यांचा आलिशान बंगला सापडला आहे. तसेच आणखी एक विमान एचडीआयएलच्या प्रवर्तकांच्या नावावर असल्याचे आढळले. तर एचडीआयएलच्या मालकांच्या नावावर ईडीला एक नौकादेखील सापडली आहे. ही नौका सध्या मालदीवमध्ये आहे. नौका ताब्यात घेण्यासाठी ईडी प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात अनेक घरे राजकर्त्यांना भेट दिल्याची माहिती पुढे येत आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.