दुनिया
इम्रान खान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास सक्षम नाहीत – बिलावल भुत्तो
nobanner
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकत नाहीत. कार्यकाळ पूर्ण करण्याइतपत इम्रान खान सक्षम नाहीत. राजकीय पक्ष, पाकिस्तानातील जनता त्यांच्या प्रशासनावर, धोरणांवर नाराज आहे अशी टीका पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली. जेपीएमसी मेडीकल सेंटरला भेट दिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
बिलावल भुत्तो पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आहेत. देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यात इम्रान खान सरकार कार्यक्षम नाही. कळसूत्री बाहुली असलेल्या सरकारवर प्रत्येकजण वैतागला आहे.
व्यापारी, शिक्षक, डॉक्टर आणि कामगार सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. त्यामुळे इम्रान खान पाचवर्ष पूर्ण करतील असे मला वाटत नाही असे भुत्तो यांनी सांगितले.
Share this: