Menu

अपराध समाचार
दादर स्थानकात तरुणीचा विनयभंग

nobanner

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एका २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. संबंधित तरुणीने पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करीत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश भट (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे.

तरुणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.२५ च्या सुमारास दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून विरार बाजूकडील महिलांचा प्रथम श्रेणी डबा पकडण्यासाठी जात होती. त्याच वेळी प्रकाश भटने समोरून येणाऱ्या या तरुणीचा विनयभंग केला. भट याने लगेच तीन नंबर फलाटावरून एक नंबर फलाटावर पळ काढला. तेथून तो स्थानकाबाहेर गेला. ही तरुणीही त्याच्या मागे गेली. परंतु तो गर्दीतून दिसेनासा झाला. परंतु, तरुणी एक नंबर फलाटावरच उभी राहिली. अवघ्या काही मिनिटांत भट पुन्हा एक नंबर फलाटवर येताच त्याला तरुणीने पकडले व लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.

यासंदर्भात मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धीवार यांनी सांगितले की, तरुणीने आरोपीला अवघ्या दहा मिनिटांत पाठलाग करून पकडले. त्या वेळी प्रकाश भट हा त्या वेळी दारूच्या नशेत होता. त्याला अटक केली असून, चौकशी सुरू आहे.