अपराध समाचार
दारुडा पती जुगारात बायको हरला, नंतर…
- 291 Views
- October 29, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on दारुडा पती जुगारात बायको हरला, नंतर…
- Edit
दिवाळीमध्ये आजही देशात अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो. असाच जुगाराचा डाव रांची येथील एका अड्ड्यावर रंगला होता. हजारीबाग येथील या जुगाराच्या अड्ड्यावर एका दारुड्या पतीने चक्क बायकोला पणाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, याबाबत त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर जुगाराच्या अड्ड्यावरील उपस्थित इतर बेवड्यांना तिचा रुद्रावतार पाहायला मिळाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हजारीबाग येथील एका जुगाराच्या अड्ड्यावर पत्त्यांचा डाव रंगला होता. जुगारात एक दारुडा त्याच्याजवळील सगळे पैसे जुगारात हरला. त्वार इतर बेवड्यांनी त्याला समजावले व डाव सोडून घरी जाण्याचा सल्ला दिला. पण तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता व त्याने बायकोला जुगारावर लावलेच. त्यानंतर जवळच्याच एका गावातील व्यक्तीने तो डाव जिंकला. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत दारुड्याच्या पत्नीला कळाल्यावर तिचा पारा चांगलचा चढला आणि तिने थेट तो जुगाराचा अड्डा गाठला. दारुच्या नशेत झिंगणाऱ्या नवऱ्याला बघून संतापलेल्या बायकोने त्याची कॉलर पकडली व त्याला लाथाबुक्क्यांनी धुवायला सुरुवात केली. मार खाताना बेवडा पती खाली पडला आणि पुन्हा लटपटत उभा राहीला. नंतर बायकोने पुन्हा त्याची यथाच्छ धुलाई केली आणि त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर व्यक्तीलाही चांगलंच फैलावर घेतलं. तिचा हा अवतार पाहून इतर बेवड्यांची मात्र पळता भुई थोडी झाली. शेवटी डाव जिंकलेल्या दारुड्यासह सगळ्यांनी तेथून काढता पाय घेतला.