Menu

देश
पुण्यात परंपरागत सगर उत्सवाचं आयोजन

nobanner

पुण्यात भाऊबीजेच्या निमित्ताने गणेश पेठेत पुणे शहर आणि जिल्हा दुग्धव्यवसायिक संघाच्यावतीने सगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सगर म्हणजे गवळी समाज बांधव आपल्या जनावरांचं दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन करतात. तसंच त्या सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.

गेल्या ७० वर्षांपासून गवळी बांधवांनी आपली परंपरा जपली आहे. तर आज या सगरमध्ये पुणे जिल्हयातील १०० हून अधिक रेडे आणि म्हशी यांची मिरवणूक वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रेड्याच्या मालकाचा विशेष सत्कार म्हणून फेटा बांधून पितळी तोडा देऊन सन्मान केला जातो.