Menu

देश
भाजपाची चौथी यादी जाहीर; एकनाथ खडसेंच्या कन्येला मुक्ताईनगरमधून उमेदवारी

nobanner

भाजपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाची उमेदवारांची चौथी यादी आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर घाटकोपर पूर्वमधून प्रकाश महेता यांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी पराग शाह यांना संधी देण्यात आली आहे. तर कुलाब्यामधून राज पुरोहित यांच्या जागी रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

बोरीवलीतून सुनील राणे, काटोलमधून चरण सिंग ठाकूर, नाशिक पूर्वमधून बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट करण्यात आला असून राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर तुमसरमधून प्रदिप पडोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नावदेखील चौथ्या यादीत नाही.