अपराध समाचार
भाजपाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नेत्याने पोस्ट केले पॉर्न व्हिडिओ
- 299 Views
- October 16, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on भाजपाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर नेत्याने पोस्ट केले पॉर्न व्हिडिओ
- Edit
अहमदाबादमधील भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर लागोपाठ पॉर्न व्हिडिओ पोस्ट केल्याची घटना घडली आहे. गौतम पटेल असे या नेत्याचे नाव असून ते भाजपाच्या नरोदा युनिटचे सचिव आहेत. “नरोदा १२” या ग्रुपवर गौतम पटेल यांनी एकापाठोपाठ एक ७० पॉर्न व्हिडिओ पोस्ट केले.
या प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये बदनामी झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. भाजपाच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कार्यकर्त्यांसह महिला नगरसेविकाही आहेत. गौतम पटेल यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक पदाधिकारी या ग्रुपमधून बाहेर पडले. भाजपा कार्यकर्त्यांनी या प्रकराची भाजपा शहर अध्यक्ष जगदीश पांचाळ आणि अहमदाबाद जिल्ह्याचे प्रमुख आय.के.जाडेजा यांच्याकडे तक्रार केली आहे.
२० महिला सदस्यांनी हा ग्रुप सोडून दिला. त्यामध्ये महिला नगरसेविकांचाही समावेश होता अशी माहिती सूत्रांनी दिली. गौतम पटेल यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. ते काय उत्तर देतात त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे जगदीश पांचाळ यांनी सांगितले. “माझा फोन हरवला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने पक्षाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ पाठवले” असा गौतम पटेल यांचा दावा आहे.