Menu

देश
मुंबईत पुढचा आठवडा पावसाचा; हवामान खात्याचा अंदाज

nobanner

मुंबईसह उपनगरात पुढच्या आठवड्यात पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर आठवडाभर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेले काही दिवस मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढील आठवड्याच पाऊस परतणार आहे.

सामान्यत: ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पडणारा पाऊस यंदा कमी होऊन ८९ मिमी इतकाच पडला. पण दरवर्षी १ ऑक्टोबरपासून सुरू होणारा परतीचा पाऊस यंदा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मुंबईसह राज्यात गेले ३ दिवस पावसाने हजेरी लावलेली नाही. पण आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. सकाळी साडे ८ ते साडे ११ या वेळेत मुंबईत १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

सामान्यत: ऑक्टोबरच्या महिन्यात परतीच्या पावसामुळे पर्जन्यमान खूपच कमी जास्त असते. काही वेळा ऑक्टोबरमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पर्जन्यमान दिसून येते. पण २०१८ साली मात्र संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात मिळून केवळ ३.८ मिमी पाऊस पडला होता. पण पुढील आठवड्यात मात्र पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूजवळील वादळाची व्याप्ती गोवा आणि कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचल्यामुळे परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर आठवडाभर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.