Menu

देश
रक्तदान करण्यासाठी त्याने केला ५०० किलोमीटरचा प्रवास; वाचवले आदिवासी महिलेचे प्राण

nobanner

ओदिशामधील राऊरकेला येथील दिलीप बारीक या व्यक्तीने एका आदिवासी महिलेचे प्राण वाचवण्यासाठी चक्क ५०० किलोमीटरचा प्रवास केला. या महिलेचा रक्तगट अगदीच दूर्मिळ असल्याने तिला रक्त देण्यासाठी दिलीप यांनी एवढा प्रवास केला.

मिळालेल्या माहितीनुसार सबिता राईता या महिलेने १३ ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. गंजम जिल्ह्यातील पत्रापूर परिसरातील मंदासिंगी गावात राहणाऱ्या सबिताची एमकेसीजी रुग्णालयामध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली. मात्र बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असल्याने सबिताच्या जिवाला धोका निर्माण झाला. सबिताला वाचवण्यासाठी रक्तसंक्रमण (ब्लड ट्रान्सफ्युजन) करणे गरजेचे होते. मात्र तिचा रक्तगट हा ‘बॉम्बे ऐ पॉझिटीव्ह’ असल्याचे समोर आले. हा रक्तगट खूपच दुर्मिळ आहे.

एमकेसीजी रुग्णालयातील ब्लड बँकच्या प्रमुख असणाऱ्या डॉक्टर रश्मीता पानीग्रही यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रक्तदात्यांच्या ग्रुप्सच्या मदतीने बॉम्बे ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर ओदिशामधीलच राऊरकेलात राहणाऱ्या दिलीप हे बॉम्बे ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांपैकी एक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलीप यांच्याशी संपर्क साधला. दिलीप यांना सबिता यांच्याबद्दल सर्व माहिती दिल्यानंतर त्यांनी रक्तदान करण्यासाठी तात्काळ होकार दिला. शनिवारी दिलीप यांनी गंजममधील एमकेसीजी रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. हे रक्त लगेचच सबिताच्या उपचारांसाठी वापरण्यात आले. दिलीप यांच्यामुळे सबिताचे प्राण वाचले.

‘बाँबे ब्लड ग्रुप’ हा शब्द सर्वाना कुठे ना कुठे ऐकायला मिळाला असेल. पण हा वेगळ्याच नावाचा रक्तगट कुठला हे मात्र अनेकांना माहिती नसते. हा रक्तगट प्रयोगशाळेत तपासल्यावर ‘ओ’ रक्तगटासारखाच दिसतो. पण इतर कोणत्याही ‘ओ’ रक्तगटाचे रक्त या रक्तगटाशी जुळत नाही. याचा शोध मुंबईला लागल्यामुळे ‘बाँबे ब्लड ग्रुप’ हे नावही रुढ झाले. या गटाच्या लोकांना बाँबे रक्तगटाचेच रक्त चालू शकते आणि हे लोक जगात फारच कमी संख्येने आढळतात. या रक्तगटाच्या व्यक्तीस जेव्हा प्रत्यक्ष रक्तदानाची गरज भासते तेव्हा त्याला रक्तदाता उपलब्ध होणे महत्वाचे असते. भारतामध्ये अंदाजचे अडीच लाख लोकांपैकी एका व्यक्ती ही ‘बाँबे ब्लड ग्रुप’ची असते.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.