अपराध समाचार
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात
- 248 Views
- October 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात
- Edit
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण हे सगळे सहकुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून मुंबईत परतत असताना हा अपघात झाला. सानपाडा सिग्नल या ठिकाणी शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहीण ज्या कारमध्ये बसले होते त्या कारला अपघात झाला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे. तर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
शर्मिला ठाकरे कारमधून परतत असताना सानपाडा सिग्नल या ठिकाणी रिक्षा मधे आली, त्या रिक्षाची धडक बसू नये म्हणून ड्रायव्हरने अर्जंट ब्रेक मारला त्याचवेळी पाठीमागून येत असलेल्या कारनेही शर्मिला ठाकरे या ज्या कारमध्ये बसल्या होत्या त्या कारला धडक दिली. राज ठाकरे हे त्यांच्या कारने पुढे निघाले होते. दरम्यान या ठिकाणी दुसरी कार मागवण्यात आली आणि त्या कारने शर्मिला ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्याआधी त्यांनी लोणावळा या ठिकाणी जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतलं. लोणावळा येथे असलेली एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याचे कुलदेवता आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी राज ठाकरे गेले होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा परतत असताना त्यांची पत्नी म्हणजेच शर्मिला ठाकरे ज्या कारमध्ये बसल्या होत्या त्या कारला अपघात झाला. राज ठाकरे यांच्या ताफ्यात असलेल्या आणखी दोन कारनाही अपघात झाला. एका मराठीवृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंची बहीण आणि त्यांचे सचिव या तिघांनाही या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे हे त्यांच्या कारमध्ये बसून पुढे गेले होते. मागून शर्मिला ठाकरे यांची कार येत होती त्याचवेळी हा अपघात झाला. दरम्यान हा सगळा प्रकार घडल्यानंतर तिथे पोलीस तातडीने दाखल झाले. दुसरी कार मागवण्यात आली ज्यामध्ये बसून शर्मिला ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.