Menu

देश
काँग्रेस-राष्ट्रवादी एकमताने घेणार निर्णय

nobanner

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असला, तरी देखील सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आपला निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज संध्याकाळी जाहीर करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल असे मल्लिकार्जुन यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसची राज्यातील वरिष्ठ नेत्यांची पुढील बैठक आज संध्याकाळी ४ वाजता होणार असून त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपला निर्णय लांबणीवर टाकला असून काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका एकमताने जाहीर करेल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.