Menu

अपराध समाचार
धावत्या बसमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, दुभाजक ओलांडून भीषण अपघात

nobanner

एसटी बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सातारा शहराजवळील खिंडवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून कऱ्हाडकडे ही बस जात होती.

मुंबईहून कऱ्हाडकडे जाणारी पाटण आगाराची एसटी बस (एमएच 20 बीएल 3667) सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी परिसरात आली असतानाच चालक विकास मारूती पवार (वय 39, रा. तळमावले, ता. पाटण) यांना हृदयविकाराचा झटका आला. परिणामी, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून एसटी विरुद्ध लेनवर गेली. त्या लेनवरून येणाऱ्या दुचाकीला एसटीने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडीत अडकली. नंतर एसटीतून प्रवासी खाली उतरल्यावर चालक पवार हे स्टेअरिंगवरच बेशुद्ध असल्याचे निदर्शनास आले. प्रवासी व काही नागरिकांनी तातडीने पवार यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तर, एसटी बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाम्पत्याला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.