अपराध समाचार
बहिणीने चुलतभावावर केला हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप
- 267 Views
- November 11, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on बहिणीने चुलतभावावर केला हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप
- Edit
एका २४ वर्षीय महिलेने चुलत भावावरच बलात्काराचा आरोप केला आहे. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. मूळची महेंद्रगडची असलेली पीडित महिला गुरुग्राम येथे एका परीक्षेसाठी गेल होती. त्यावेळी तिच्याबरोबर हा प्रकार घडला. परीक्षा केंद्रावर पीडित महिलेची चुलतभावाबरोबर भेट झाली. तिथेच आरोपीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी महिलेला राजी केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
२२ सप्टेंबरला ही घटना घडली. पीडित महिलेने शनिवारी महेंद्रगड येथे तक्रार नोंदवल्यानंतर रविवारी गुरुग्राम येथे ही तक्रार ट्रान्सफर करण्यात आली. महेंद्रगड पोलीस स्टेशनमध्ये झीरो एफआयआर नोंदवल्यानंतर गुरुग्रामच्या महिला पोलीस स्थानकात तक्रार ट्रान्सफर करण्यात आली. तपास सुरु झाला असून पीडित महिलेची जबानी नोंदवण्यात आली आहे गुरुग्राम पोलीस स्टेशनचे पीआरओ सुभाष बोकन यांनी ही माहिती दिली.
मी परीक्षेसाठी गुरुग्राम येथे गेली होते. परीक्षा केंद्रावर मला चुलतभाव भेटला. त्याने गुरुग्राम बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये राहण्यासाठी मला राजी केले असे पीडित महिलेने तिच्या जबानीत म्हटले आहे. २२ सप्टेंबरच्या रात्री हॉटेल रुममध्ये आरोपीने माझ्यावर लैंगिक जबरदस्ती केली. मी कोणाकडे याबद्दल वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी सुद्धा त्याने मला दिली असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. परीक्षेचा पेपर दुसऱ्या दिवशी होता. त्यामुळे मी कोणाकडेही घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केली नाही. परीक्षा देऊन घरी परतल्यानंतर तिने कुटुंबियांना घडल्या प्रकाराबाबत सांगितले. पण दोन महिन्यानंतर तिने तक्रार नोंदवली. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.