देश
मराठा आरक्षणप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
nobanner
मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील अपिलांवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याद्वारे दिलेले आरक्षणाचे १६ टक्क्यांचे प्रमाण १२-१३ टक्के कमी करून तो वैध ठरवणारा निर्णय उच्च न्यायालयाने २७ जूनला दिला. त्याविरोधात जयश्री पाटील यांच्यासह अन्य अनेक विरोधी जनहित याचिकादारांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
Share this: