Menu

अपराध समाचार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरला कारची धडक, चौघांचा मृत्यू

nobanner

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवरील लेनवर हा अपघात झाला. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबईला जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत नातेवाईक असण्याची शक्यता आहे. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.