Menu

अपराध समाचार
चंद्रपुरात लोखंडी हातोड्याने वार करून वडिलांकडून मुलाची हत्या

nobanner

घरगुती कलह विकोपाला गेल्यानंतर जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांनी दिली.

मुलगा राहुल याला दारूचे व्यसन होते. मद्यधुंद अवस्थेत तो कुटुंबातील लोकांना सतत त्रास देत होता. मुलाच्या सततच्या या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी झोपेत असलेल्या राहुलच्या डोक्यावर जन्मदात्या पित्यानेच लोखांडी हातोडीने घाव घालून जागीच ठार केले

स्वतःच्या लहान मुलीसह आईवडील यांनाही त्रास देत होता. त्यामुळे विवंचनेत वडील सोपान नगराळे यांनी मुलाचा खून केला. त्यानंतर घराबाहेर निघून मुलाची हत्या केल्याचे शेजारच्या लोकांना सांगत पोलिस स्टेशन गाठलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.