देश
दोषी असतील तर त्यांनाही पेटवा; आरोपींच्या पालकांची संतप्त प्रतिक्रिया
हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर पीडित तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळणाऱ्या चारही आरोपींना फाशी देण्याची मागणी नागरिकांनाकडून केली जात आहे. त्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या आईंनी, जर आमची मुलं दोषी असतील तर त्यांना नक्कीच शिक्षा करा अशी मागणी केली आहे.
गुरूवारी तेलंगणाला जाग आली ती एका धक्कादायक बातमीने. एका 26 वर्षीय डॉक्टर तरूणीला जीवंत जाळण्यात आलं आहे. पुढे चौकशीत अशा गोष्ट समोर आल्या की, त्या तरूणीवर लक्ष ठेवून राहिलेल्या चार नराधमांनी सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळलं आहे. स्कूटी बंद पडलेल्या तरूणीची मदत करत सांगून तिला अज्ञातस्थळी घेऊन गेले. तिला जबरदस्ती दारू पाजून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवंत जाळण्यात आलं आहे.
या घटनेने फक्त तेलंगणातच नाही तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना भर रस्त्यात फाशीची शिषा द्या अशी मागणी केली जात आहे. चार आरोपींपैकी एक आरोपी चेन्नाकेशवुलूची आई जयम्माने मीडियाला सांगितले,’जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला पळ जाळा. माझा मुलगा माझा नाही. चूक ही चूकच आहे त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी.’ अशी संतप्त प्रतिक्रिया एका आरोपीच्या आईने दिली आहे.
आई ही आईच असते. मग ती कुणाचीही असो. आरोपीच्या आईने पीडित तरूणीच्या आईचं दुःख समजून घेतलं. नऊ महिने गर्भात ठेवून त्या आईने देखील तिच्या मुलीला जन्म दिला आहे. अशा घटनेत तिच्या मुलीवर अत्याचार झाला आहे. ती कोणत्या परिस्थितीतून जा आहे. याचा मी विचार करू शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
जयम्माने सांगितल्यानुसार, अरीफ या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी मंगळवारी त्यांच्या घरी आला आणि चेन्नाकुशवुलूला घेऊन गेला. कुशवुलूल बुधवारी पुन्हा घरी येण अपेक्षित होतं पण तो आला नाही. केशवुलू गेले सहा महिने कामावर नसून त्याला किडनीचा त्रास आहे. यावर तो हैदराबादच्या निझाम रूग्णालयात उपचार देखील घेत असल्याची माहिती त्याच्या आईने दिली आहे.
‘मला विश्वास बसत नाही की, त्याने हा गुन्हा केला आहे. पण जर त्याने तो केला असेल तर त्याकरता त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी’, अशी प्रतिक्रिया केशवुलूच्या आईने दिली आहे. त्याचप्रमाणे हत्याकांडाचा मुख्य आरोपी अरीफ (मोहम्मद पाशा) चे वडिल हुसैन्न यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर माझा मुलगा दोषी असेल तर त्याला शिक्षा ही व्हायलाच हवी.’